कृष्णा नदीत बचाव कार्याची बोट उलटून १५ जण बेपत्ता ; ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कृष्णानदीने रौद्ररूप धारण केले असल्याने सध्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील बराच गावांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच पलूस तालुक्यात ब्रम्हनळी गावात बचाव कार्य सुरु असताना बोट उलटून १५ बुडाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात प्रशासनाकडे पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

कृष्णा नदीच्या काठी असणाऱ्या गावांना पुराचा अधिक प्रमाणात फटका बसला असून पुराच्या पाण्याने अनेक गावांमध्ये पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशातच खेडेगावात असणाऱ्या जनावरांना वाऱ्यावर टाकून लोक आपला जीव वाचवण्यासाठी गावातून बाहेर पडत आहेत. अशात त्या जनावरांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न देखील तोकडे पडत आहेत.

दरम्यान ब्रम्हनळी गावात घडलेल्या घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याच प्रमाणे त्यांच्यासाठी एनडीआरएफच्या माध्यमातून तपासकार्य राबवण्यात येते आहे. परंतु पुराच्या या भीषण पाण्यात या लोकांचा तपास लागणे कठीणच असणार आहे. मात्र एनडीआरएफचे जवान सध्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

म्हणून सुषमा स्वराज यांचे निधन होताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ढसाढसा रडले

नरेंद्र मोदी यांनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन

३७० कलमासंदर्भातील विधेयक लोकसभेत देखील संमत

अजित पवारांच्या त्या टीकेवर गिरीश महाजन म्हणतात

अजित पवारांची जीभ घसरली ; गिरीश महाजनांना म्हणाले ‘नाच्या’

Leave a Comment