१० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कॉंग्रेसच्या महिला जि.प.सदस्याला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर जिल्हा परिषद सर्कलच्या महिला जिल्हा परिषद सदस्या व त्यांचे पती या दोघा पती पत्नीला १० हजार रुपयांची लाच घेतांना आज दि २४एप्रिल रोजी  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्याची घटना दुपारी घडली.

या घटनेमुळे अमरावती जिल्हात खळबळ उडाली आहे सौ.अनिता राजु मेश्राम(वय- 45 वर्ष), जि.प.सदस्य, तळेगाव दशासर सर्कल व त्यांचे पती राजू एकनाथ मेश्राम, वय 50 वर्ष या पती पत्नी जोडप्यांना अटक करण्यात आली आहे
तक्रारदार यांचा लाकुड तोडून विक्री करण्याचा व्यवसाय आहे.

तक्रारदार यांनी तळेगाव दशासर येथिल तलावाचे भिंतीवरील छाटलेल्या बाभळीच्या झाडामुळे त्यांचे विरूध्द तक्रार नकरण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या अनिता मेश्राम यांनी तक्रारदार यांना 15,000 रू लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती 10,000/-रू. लाच स्विकारण्याचे मान्य केले होते मात्र तक्रार दाराने याबाबत सदर तक्रार अमरावतीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्यामुळे एसीबीने यशस्वी सापडा रचत कारवाई केली दरम्यान 10,000/- रू लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारून आरोपी राजू मेश्राम ला दिली वरून दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन दोघांना अटक करण्यात आले आहे,सदर महिला जिल्हा परिषद सदस्या ह्या काँग्रेस पक्षाच्या असून या कारवाईमुळे जिल्हात चांगलीच खळबळ उडाली आहे

Leave a Comment