आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना काढणार ‘हि’ यात्रा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार आहे. हि यात्रा महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात जाणार असून यासाठी शिवसेना तगडे नियोजन आखते आहे. देवेंद्र फडणवीस १ ऑगस्टपासून ‘फिर एक शिवशाही बार सरकार’ या प्रचार यात्रेचा शुभारंभ करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या यात्रेच्या आयोजनाच्या धरतीवर शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा काढत आहे.

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सूक्ष्म मुष्ठीयुद्ध सुरु आहे. त्याचा परिणाम म्हणून या यात्रेचे आयोजन असू शकते. तसेच शिवसेना आणि भाजप त्यांच्यातील सत्ता संघर्षापासून या यात्रांचा जन्म झाला आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे. ज्यांनी मत दिलं त्यांचे आभार मानायचे आहेत. ज्यांनी मत दिल नाही त्यांची मने जिंकायची आहेत असे आदित्य ठाकरे यांच्या यात्रेचे ब्रीद वाक्य आहे.

येत्या शुक्रवार पासून आदित्य ठाकरे या यात्रेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. त्याच प्रमाणे येत्या काळात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून शिवसेना घोषित करू शकते. अथवा भाजपपुढे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा रेटा वाढवू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment