विमानातून घिरट्या घालून काहीच होणार नाही ; प्रकार आंबेडकरांचा फडणवीसांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | गेल्या पाच सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही पूरग्रस्तांना मदतीची हाक दिली आहे . महापूराने बाधित झालेल्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यामुळे केवळ विमानातून घिरट्या घालून काही होणार नाही, असा टोला आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

शरद पवारांचे जवळचा नातेवाईक आणि राष्ट्रवादी आमदार असणारा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

अद्यापही पूरग्रस्त भागातील अनेक गावांमध्ये शासकीय मदत मदत पोहचली नाही.कोल्हापूर व सांगली शहर पाण्यामध्ये आहे, पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना अन्न, कपडे आणि पिण्याच्या पाण्याची गरज आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचारात गुंतले आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . अनेक नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत . त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी पक्षपातळीवर हजर रहावे, तसेच अन्न, गरम कपडे, औषधे आदी साहित्याची मदत करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले आहे. यात त्यांनी आवर्जून ‘भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सर्व कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपलब्ध राहावे , अशी कळकळीची विनंती सर्व कार्यकत्यांना आणि समाज बांधवांना करण्यात आली आहे.

दरम्यान सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातून दोन लाखांहून अधिक नागरिक आणि २२ हजार जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. एनडीआरएफ, नौदल, लष्कर आणि तटरक्षक दल यांच्या विविध पथकांद्वारे मदतकार्य सुरू आहे.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले

गिरीश महाजनांच्या पूर पर्यटनाचा विरोधांसोबत नेटकऱ्यांनी घेतला खरपूसर समाचार

शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल

सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस

Leave a Comment