३७० कलमासंदर्भातील विधेयक लोकसभेत देखील संमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | अमित शहा आणि काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात झडलेल्या कलगीतुऱ्या नंतर 370कलमासंदर्भातील दुरुस्ती विधेयक लोकसभेत देखील संमत झाले आहे. विधेयकाच्या बाजूने 370 तर विरोधात 70 पडली आहेत.

३७० कलमासंदर्भातील दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने हे विधेयक कायद्यात रूपांतरित होणार आहे. त्यामुळे आता येत्या दोन दिवसात कश्मीर कायदेशीर दृष्ट्या केंद्रशासीत प्रदेश म्हणून समोर येईल.

 

दरम्यान काल राज्यसभेत हेच विधेयक १२५ विरुद्ध ६१ अशा फरकाने संमत झाले आहे. राज्यसभेत देखील या विधेयकावर मोठी वादळी चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मतदानाला टाकण्यात आले. त्यावर मतदान झाल्यानंतर हे विधेयक राज्यसभेने स्वीकारल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांची पाठ थोपटली.

Leave a Comment