ताज्या बातम्यायवतमाळराजकीय

महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार

यवतमाळ प्रतिनिधी मागील काही दिवसापासून पक्षांतरांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार माजी मंत्री मनोहर नाईक हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते आहे. जागा वाटपात पुसद विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने नाईक कुटुंब शिवसेनेत जाणार आहेत. यासंदर्भात मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांनी खुलासा केला आहे. येत्या काही दिवसात आम्ही राष्ट्रवादी सोडणार आहे. आम्हाला शिवसेना, भाजप दोन्हीकडून ऑफर आहेत असे इंद्रनील नाईक म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचे तिसरे आणि सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाईक घराणे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे घराणे मानले जाते. त्यानंतर याच घराण्यातील सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेले हे घराणे आहे. पुसद म्हणजे नाईक नाईक म्हणजे पुसद अशी म्हण विदर्भात प्रचलित आहे. त्यामुळे नाईक कोणत्याही पक्षात गेले तरी ते पुसदमधून निवडून येणार म्हणून नाईक घराणे शिवसेनेत जाणार आहे.

भाजपने मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईक आधीच गळाला लावले आहेत. तसेच त्यांना विधान परिषदेची आमदारकी देखील बहालकेली आहे. त्यामुळे नाईक कुटुंब शिवसेनेत गेल्यास नवल वाटण्यासारखे काहीच नाही असे देखील बोलले जाते आहे.

महत्वाच्या बातम्या 

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपमध्ये करणार प्रवेश

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

बागलांचा जीव भांड्यात ; संजय शिंदे करमाळा विधानसभेसाठी इच्छुक नाहीत
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares