महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या खासदार, आमदार, नगरसेवक , जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी आपले एका महिन्याचे वेतन सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देण्याचे निर्देश दिले आहे. या आदेशानुसार प्रत्येक लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीच्या नावे आफत निधी असा आपल्या एक महिन्याच्या वेतनाच्या मूल्याचा चेक लिहून जमा करायचा आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी किमान १०० रुपये आणि जास्तीत जास्त आपल्या इच्छेने कितीही रुपयांची मदत भाजपच्या आफत निधी कोषात जमा करावी असे आवाहन भाजपच्या कर्यकर्त्यांना चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तर भाजपचे माजी महामंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची याकामी चंद्रकांत पाटील यांनी नेमणूक केली आहे. त्याच प्रमाणे भाजप अंतर्गत लवकरच पूरग्रस्तांना मदत करण्याची समिती स्थापन करण्यात आला आहे.

दरम्यान आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती निवळण्यास मदत झाली असून जनजीवन पूर्वस्थितीवर यायला प्रारंभ झाला आहे. कोल्हापूरात रस्ते उघडे पडल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. तर सांगली जिल्ह्यात देखील पूरस्थिती दूर होण्यास सुरुवात झाली आहे.

Leave a Comment