पूरग्रस्त ब्रह्मनळी गाव प्रकाश आंबेडकरांनी घेतले दत्तक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |  आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी पोचण्यात उशीर झालेले ब्रम्हनळी गावाच्या ग्रामस्थांनी स्वतःच्या बोटीने प्रवास करण्यास सुरुवात केली. मात्र नदीच्या पात्राच्या मधोमध गेल्यावर बोट पलटून झालेल्या अपघातात १७ लोकांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर आता हेच गाव वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतले आहे.

ब्रह्मनळी ग्रामपंचायतीची स्वतःची बोट होती. प्रशासनाने मदतीला येण्यास उशीर केल्याने ग्रामपंचायतने आपल्या बोटीने ग्रामस्थांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बोट पाण्यात उतरवली. त्या बोटीची क्षमता १६ ची असताना त्या बोटीत ३० ते ३४ च्या दरम्यान लोक बसले. त्यामुळे मध्यभागी गेल्यावर बोट पलटी झाली. त्यात १७ लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला आणि शासनकर्त्यांना जाग आली.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी या गावाच्या मदतीला पुढाकार घेऊन या गावाला दत्तक घेतले आहे. त्याच प्रमाणे पंढरपूर देवस्थानच्या वतीने ५ गवे दत्तक घेण्यात आली आहेत. तसेच नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडीशनने देखील २ गावे दत्तक घेतली आहेत.

Leave a Comment