मालवाहू वाहन पलटून १ ठार, १८ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिकी जोशी , 

चोपडा येथून जवळच असलेल्या काजीपुरा फाट्यापुढे आज मालवाहू वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १८ मजूर जखमी झाले आहेत.

या संदर्भात अधिक असे की, आज सुमारास मालवाहू गाडी 30 ते 35 मजूरांना घेवून अडावदहून शिरपूरकडे जात असताना अचानक पलटी झाली. या अपघातात समोरून येणाऱ्या मोटार सायकलस्वारचा मृत्यु झाला. तर मालवाहू गाडीतील १८ जण जखमी झालेत. जखमींमध्ये अझोरुद्दीन हमीद तडवी(वय 18),इर्शाद दमीद तडवी(वय 19), नूरजहाँन हमीद तडवी (वय 48), हमीदाबी रमजान तडवी (वय 45),सिमरन सुपडू तडवी (वय 14), राजू सिकंदर तडवी (वय 22) , हमीदा रमजान तडवी ( वय42), खातूनबी रहेमान तडवी (वय 60) ,बतूलबी सुमान तडवी (वय 45), लुकमान अरमान तडवी (वय 25) ,हमीदा नत्थु तडवी( वय 34), साहिल सुपडू तडवी ( वय 18) , मेहमूदाबी नथ्थु तडवी (वय 40), एनूरबी कलिंदर तडवी (वय 50), शाहिद शरद तडवी (वय 19), शेखर गंभीर तडवी (वय 23) , खातूनबी सायबू तडवी (वय 50), (सर्व राहणार अडावद ता.यावल) तसेच गोपाल दगडू महाजन (वय 25 रा. किनगाव)यांचा समावेश आहे.दरम्यान, मोटारसायकल वरील मयत तरुणाचे नाव समजू शकले नाही.

Leave a Comment