शरद पवारांच्या त्या विधानाला चंद्रकांत पाटलांचे चोख उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये आमच्या पक्षाचे नेते जात आहेत कारण त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावून त्यांना भीती दाखवली जाते आहे असा आरोप शरद पवार यांनी केला होता त्या विधानाचा चंद्रकांत पाटील यांनी आज चांगलाच समाचार घेतला आहे.

ईडीच्या चौकशीने घाबरून भाजपमध्ये यायला शिवेंद्रराजे आणि मधुकर पिचड हि काय साधीसुधी माणसे आहेत का. जी चौकशीने भिऊन भाजपमध्ये सामील होतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. भाजपच्या महापक्षप्रवेश सोहळ्यात ते आज बोलत होते. ज्या त्या भागातील नेत्याला वाटते की यांच्या पक्षात राहून आपण आमदार होणार नाही. आपल्या लोकांचे प्रश्न सोडवू शकणार नाही. त्यामुळे ते नेते भाजपमध्ये येत आहेत याला शरद पवार दुसरच रूप देऊ पाहत आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेनेतून छगन भुजबळांना तुम्ही फोडले. शिवसेनेतूनच गणेश नाईकांना फोडले तेव्हा त्यांना भीती दाखवायला तुम्ही त्यांच्यावर ईडीची चौकशीच लावली होती का असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना विचारला आहे. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांचे पक्षांतर म्हणजे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. दरम्यान १३ ऑगस्टला मोठा धमाका बघायला मिळेल असे चंद्रकांत पाटील यांनी मागे म्हणले होते. त्यामुळे ते नेमका कोणता धमाका करणार हे आता बघण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment