वेल्हे तालुक्याला राजगड नाव द्या : सुप्रिया सुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हे तालुक्याला राजगड असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. वेल्हे तालुक्याला राजगड नाव द्यावे कारण तेथील लोकांची देखील तीच इच्छा आहे. त्यामुळे राज्य शासनाने याबद्दल लवकरात लवकर पावले उचलावी असे सुप्रिया सुळे यांनी म्हणले आहे.

वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून सर्वांचे या विषयाकडे लक्ष आकर्षित केले आहे. “छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे.येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला.स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले. ” असे सुप्रिया सुळे त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हणले आहे.

शिवकाळापासून ते १९४७ पर्यंत या तालुक्याचे नाव राजगड असेच असल्याचे सरकारी कागदपत्रात आढळते. त्याच प्रमाणे १९३९ साली पालखुर्द गावाचा नकाशा प्रकाशित करण्यात आला त्या नकाशात देखील वेल्हे तालुक्याला राजगड तालुका असे म्हणण्यात आले आहे. तसेच इतिहास संशोधक मंडळाकडे वेल्हे या तालुक्याचे नाव राजगड असल्याचे अनेक पुरावे पडले आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Leave a Comment