१ लाखाचे बक्षीस असणारा नक्षलवादी पोलीस कारवाहीत ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सुकमा ( छत्तीसगड ) | आज मंगळवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यात झालेल्या चकमकी मध्ये १ एक नक्षलवादी ठार झाला आहे. या चकमकीत जो नक्षलवादी ठार झाला आहे. त्या नक्षलवाद्यावर १ लाखाचे बक्षीस देखील लावले गेले होते. मडकम हिंडमा असे त्या नक्षलवाद्यांचे नाव आहे. त्याच प्रमाणे या भागात सुरक्षा दलाच्या वतीने शोध मोहीम राबवली जात आहे.. आणखी काही नक्षलवादी जंगलात दबा धरून बसले असल्याचा संशय आहे. त्यामुळे येथे शोध कार्य करण्यात येते आहे.

या चकमकी नंतर नक्षलवाद्यांनी दाट जंगलात पळ काढला तर त्यांच्या कडून पोलिसांनी मोअसणारा ठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे. सुकमाचे पोलीस अधीक्षक शालभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार डीआरजीचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत १ लाखाचे बक्षीस असणारा नक्षलवादी मडकम हिंडमा हा जागीच ठार झाला. जवानांनी नक्षल्यांचा शस्त्रसाठा देखील मोठ्या प्रमाणावर जप्त केला आहे.

छत्तीसगडची राजधानी रायपूर पासून ५०० किमी अंतरावर नक्षलांच्या शोधासाठी डीआरजीचे एक पथक बिरभट्टी गावाजवळील जंगलात निघाले होते. नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी देखील जवाबी गोळीबार केला असे नक्षलविरोधी मोहीमेचे उप-महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी म्हणले आहे.

Leave a Comment