राज ठाकरेंना ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर मुख्यमंत्री म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल भूखंडाच्या प्रकरणात नोटीस पाठवली आहे. त्या प्रकरणी मनसेने भाजप सूडाचा डाव खेळत असल्याचे म्हणत भाजपवर सडकून टीका केली आहे. तर याच प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी याबद्दल म्हणले की ईडी एक स्वायत्त संस्था आहे. राज ठाकरे यांना आलेल्या नोटिसी बद्दल मला फक्त माध्यमातून जेवढे समजले आहे. तेवढीच माहिती आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

या तीन अटीवर रामराजे निंबाळकर करणार भाजपमध्ये प्रवेश

ईडी एक स्वायत्त संस्था आहे. ईडीच्या कामात कोणीच हस्तक्षेप करत नाही. ईडीला काही आक्षेपार्य आढळल्यास ईडी नोटीस पाठवून त्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलवत असते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या व्यवहारात ईडीला काही आक्षेपार्य वाटले असावे म्हणून त्यांना ईडीने नोटीस पाठवून चौकशीला बोलावले असावे असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.

तिकीट मिळण्याच्या खात्रीमुळेच शिवसेनेत प्रवेश करत आहे

दरम्यान राज ठाकरे यांना ईडीने २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. राज ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीला मनसेने सुडाचे राजकारण म्हणून संबोधले आहे. तर मनसेच्या वतीने अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना आधुनिक हिटलर देखील संबोधण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा

गणेश नाईकांचा भाजपला धक्का ; त्यांच्या ‘या’ कृतीने भाजप हैराण

राज ठाकरेंना नोटीस आलेले कोहिनूर मिल प्रकरण नेमके आहे तरी काय?

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक

Leave a Comment