ताज्या बातम्यापुणे

अतिवृष्टीचा पाऊस पुणे जिल्ह्यात या तालुक्यातील शाळा कॉलेज उद्या राहणार बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पुण्यात अंशतः पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मागील दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद ठेवली होती. तर उद्या देखील अतिवृष्टीची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काही तालुक्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निर्णय जाहीर केला आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाने उगडीप दिली असली तरी अद्याप मुळशी, भोर, वेल्हे, मावळ तालुक्यात अद्याप पावसाचे रौद्र रूप शांत झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील शाळा कॉलेज उद्या ७ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे बंद ठेवल्या जाणार आहेत.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या वतीने उद्या महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याच प्रमाणे खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग अद्याप हि कमी झाला नाही. त्यामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares