विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; काँग्रेस नेत्यांनी भोवया उंचावल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | अकस्मात आलेल्या महापूराने कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजीत कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस कडेगावालाही चांगला फटका बसला आहे. ही पूरस्थिती वर्णन करण्यासाठी कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी असल्याचे कदम यांनी फेसबूक पोस्टमधून सांगीतले आहे. मात्र, कॉंग्रेसची राजकीय अस्मिता आणि अवस्था पाहता कदम यांची फडणवीसांसोबतची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

विश्वजीत कदम यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले, आज सकाळी मुंबईत राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व सांगलीतील ,विशेषत: माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातील पुरग्रस्त भागाच्या विदारक स्थिती बद्दल छायाचित्रे व व्हिडीओ च्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. तसेच प्रभावी मदतकार्याबद्दल मी तयार केलेला आराखडा सादर केला.

शासनाने जाहीर केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम भरपाई म्हणून मिळावी, शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी व्हावी. शेतमजूर , व्यापारी याना आर्थिक सहाय्य केले जावे , ज्यांच्या पशुधनाची वा राहत्या घराची हानी झाली आहे अशांना मदत मिळावी, शाळांची दुरुस्ती केली जावी व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पाठयपुस्तके मोफत मिळावीत आदी १५ प्रमुख मागण्या त्यांनी केल्याचे सांगीतले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांचे झूडीनं भाजपमध्ये पक्षांतर झाले. तसेच विधानसभेच्या तोंडावर अनेक नेते भाजपत जाणार असल्याची माहिती होती. तसे वातावरणच राज्यात तयार झाले होते. परंतू कोल्हापूर सांगलीच्या महापूराने राज्यात वातावरण तात्पुरते तरी बदलले आहे. तरीही विश्विजीत कदम यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट राजकीय वर्तूळात चर्चेचा विषय ठरत आहे.

राष्ट्रवादीचा लोकसभा उमेदवार झालेल्या त्या शिवसेना नेत्याची उद्या घर वापसी

मुंबई मनपाच्या ५८ हजार कोटीच्या फिक्स ठेवी तरी देखील मुंबई पाण्यात बुडते ; गडकरींचा शिवसेनेला घरचा आहेर

म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी जमले २ दिवसामध्ये २० कोटी

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे आले आमने सामने

म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत केली वाढ

Leave a Comment