‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्यांच्या मातोश्रीबाहेर पाणी साचलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मुंबई मध्ये पावसाचे पाणी तुंबून राहिल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची आणि मुंबईच्या महापौरांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. करून दाखवलं म्हणाऱ्यांच्या मातोश्री बाहेर पाणी साचले आहे. तर मुंबई मध्ये पाणीच साचले आहे असे महापौर म्हणत आहेत. चार दिवस मुंबईमध्ये पाणी साचलं आहे. चार दिवसात चाळीस लोकांना आपले प्राण एकट्या मुंबई मध्ये घालवले लागले आहेत. मुंबईची लाइफ लाईन समजली जाणारी मुंबई लोकल तुंबलेल्या बंद आहे असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

विधिमंडळ कामकाजाचे कलम २८९ नुसार धनंजय मुंडे यांनी तुंबलेल्या पाण्यामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प असल्याच्या मुद्दयांवर विधान परिषदेत तातडीची चर्चा बोलावली होती. नालेसफाईच्या नावाखाली खर्च केले जाणारे २०० कोटी रुपये गेले कुठे २६ जुलै २००५ साली घडलेल्या घटनेनंतर नाले सफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची परंपरा सुरू झाली. मागील दहा वर्षात ३ ते ४ हजार कोटी रुपये नाले सफाईच्या नावाखाली खर्च करण्यात आले आहेत. हा पैसा कोणाच्या खिशात गेला आहे असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचारावर मागील चार वर्षांपासून सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र राज्य सरकार या भ्रष्टाचाराची चौकशी करायला घाबरत आहे. यातून कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण सरकार मुंबई महानगर पालिकेला सत्तेचे मुख्य केंद्र समजत आहे असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

Leave a Comment