शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणारा धनगर मेळावा उधळवून लावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर प्रतिनिधी | प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणारा धनगर मेळावा उधळून लावण्याचा इशाला धनगर समाजाचे नेते सुभाष मस्के यांनी दिला आहे. सत्तेच्या काळात धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच केले गेले नाही त्यांनी घेतलेला हा मेळावा निवळ राजकीय फायद्याचा मेळावा आहे. त्यामुळे आम्ही हा मेळावा उधळवून देणारा आहे.

अण्णा डांगे हे राष्ट्रवादीत गेले आहेत त्यामुळे ते हा मेळावा आयोजित करत आहेत. त्यांच्या सोबत काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अप्पासाहेब रुपनवर हे देखील या मेळाव्याचे आयोजन करण्यात व्यस्थ आहेत. धनगर समाजाने या मेळाव्याला उधळून देण्याचा इशारा दिल्याने हा मेळावा होणार का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.

धनगर समाजाच्या प्रश्नासाठी हा मेळावा घेण्यात येणार असून प्रियांका गांधी आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रामहरी रुपनवर आणि अण्णा डांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता धनगर समाजाच्या वतीने या मेळाव्याचा विरोध केला जात आहे.

म्हणून चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ

राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त

महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड

Leave a Comment