काँग्रेसची भष्टाचाराची जत्रा उघडी पडल्याने त्यांनी यात्रा रद्द झाली : देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपची महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या निमित्त पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली आहे. काँग्रेसची भष्टाचाराची जत्रा उघडी पडल्याने त्यांनी यात्रा रद्द झाली त्यांची यात्रा निघणार आहे की नाही याची मला माहिती नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

तुम्ही सर्व पत्रकार आहात. राज्याच्या राजकारणाची तुमच्याकडे खबरबात असते. त्यामुळे कोणती यात्रा अधिक प्रभावी आहे या बद्दल मला सांगण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादीच्या यात्रेची हालत काय आहे हे देखील मला बोलण्याची आवश्यकता नाही. मात्र आमच्या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आमच्या सरकारने लोकांची काही कामे केली काही करायची राहिली देखील असतील मात्र लोकांची भाजप प्रति आस्था आहे. त्यांना वाटते की आमचा पक्ष त्यांची कामे करेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रा निघाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेत सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचत आहेत. त्याच प्रमाणे भविष्यात करावयाच्या कामांची देखील माहिती जनतेला देत आहेत. अशात राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रा काढून मुख्यमंत्र्याच्या यात्रेला प्रतित्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाजानदेश यात्रा २२ ऑगस्ट पासून सुरु झाली असून येत्या १ सप्टेंबर रोजी या यात्रेचा समारोप सोलापूर मध्ये होणार आहे. या समारोपाला अमित शहा अथवा नरेंद्र मोदी संबोधित करण्यास येऊ शकतात.

Leave a Comment