घरकुल घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी | घरकुल घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक केल्याची घटना आज धुळे शहरात घडली. जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन फेटाळताच पोलिसांनी त्यांना न्यायालयातच अटक केली आहे. डॉ. हेमंत देशमुख असे या नेत्याचे नाव असून ते काँग्रेस सत्तेत असताना राज्यमंत्री होते.

अटकपूर्व जामीनाची मुदत संपत आल्याने हेमंत देशमुखांनी त्यांनी न्यायालयात कारवाही पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने त्यांच्या मागणीला फेटाळून लावले तसेच त्यांचा जमीन देखील नामंजूर केला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी आधी ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना अटक केल्याचे जाहीर केले. आता या खटल्याची न्यायालयीन प्रक्रिया निपक्षपणे तसेच जलद गतीने व्हावी अशी मागणी सर्व सामन्यातून होत आहे.

२०१६ साली या घोटाळ्या संदर्भात सर्वप्रथम आवाज उठवला गेला आणि दोंडाई पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आदिवासी दलित मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी या संदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याच याचिकेच्या आधारावर माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख आणि माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे तसेच तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, अमोल बागुल, राजेंद्र शिंदे अशा सात व्यक्तींवर या घोटाळ्या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याच्या तपासातून पोलीसांना समजले की या घरकुल योजनेच्या ठेकेदाराने माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये टाकले आहेत. या वाळनावरूनच तपास पुढे गेला आणि माजी मंत्री आणि संबधीत आरोपीच्या विरोधात मोठे पुरावे गोळा झाले.

Leave a Comment