‘ती’ एकही जागा भाजप, शिवसेनेला सोडणार नाही : रावसाहेब दानवे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवकाश राहिला असल्याने निवडणुकीचे रण आत्ता पासूनच तापू लागले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला आम्ही गत निवडणुकीत जिंकलेल्या जागा पैकी एक हि जागा दिली जाणार नाही असा पवित्रा रावसाहेब दानवे यांनी घेतला आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत स्वबळावर १२३ जागा जिंकल्या आहेत.

गत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे निकाल जेव्हा समोर आले तेव्हा भाजप १२३ जागांवर विजयी झाले होते. तर शिवसेना ६३ जागांवर विजयी झाली होती. मात्र आता युतीत शिवसेनेने भाजपच्या ताब्यात असणाऱ्या नाशिक शहरातील २ जागा आणि पुण्यातील हडपसर आणि कोथरूडची जागा भाजपकडे मागितली आहे. मात्र भाजप या जागांची पूर्तता करणार नाही असेच रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरून दिसते आहे.

रावसाहेब दानवे यांनी जाणीव पूर्वक मुख्यमंत्री पदावर भाष्य करण्याचे टाळले आहे. मुख्यमंत्री कोण होणार या बाबींचा निर्णय शिवसेना आणि भाजप मध्ये झालेला आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार नाही असे रावसाहेब दानवे यांनी म्हणले आहे. तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला महिलांना आरक्षण देण्याच्या मुद्द्याचे रावसाहेब दानवे यांनी समर्थन केले आहे. अटलजींच्या काळापासून आज मोदींच्या काळापर्यंत भाजपचा या मुद्द्याला पाठिंबा आहे असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

Leave a Comment