सोपी रेसिपी असणारा ‘टोम्याटो राईस’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली | भात भारताचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे भारतात भारताचे विविध प्रकार पाहण्यास मिळतात. तसेच भात हा भारतीय संस्कृतीचा देखील अविभाज्य भाग झाला आहे. पुणेकरांनी शोधून काढलेला आणि चवीला अत्यंत चविष्ट लागणारा खाद्य प्रकार म्हणून ‘टोम्याटो राईस’ कडे बघितले जाते. म्हणून आम्ही आमच्या वाचकांसाठी या ‘टोम्याटो राईस’ची रेसिपी आणली आहे.

ब्रेकिंग| सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार!

साहित्य : एक वाटी तांदूळ, कांदा उभा चिरून , टोम्याटो ४, लाल मिरची पावडर , हळद, हिंग, गरम मसाला, जिरे , तपाल पत्र ,बारिक चीरलेली कोथींबीर, चवीनुसार मीठ

राज्यात देवेंद्रच नरेंद्र ; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचा फाटा

कृती : ५ वाट्या पाणी भांडयात घेऊन त्या पाण्याला गॅसवर गरम करण्यास ठेवावे. त्यानंतर त्या पाण्याला उखळी आल्यानंतर त्यात तांदूळ उकडायला घालवते. बिर्याणी बनवण्यासाठी ज्या प्रमाणे भात शिजवून घेतला जातो. त्याप्रमाणे भात शिजवून घ्यावा. त्यानंतर तेल कढई मध्ये गरम करण्यास ठेवावे त्यात तमालपत्र घालून ते तडतडावे. नंतर उभा चिरलेला कांदा लालसर भाजून घ्यावा त्यातच अर्धा चमचा जिरे घालावे. त्यानंतर त्यात दोन चिरलेली टोम्याटो घालावेत.टोम्याटो अर्धकच्चे असताना त्यात चिमूटभर हिंग, लाल चिखट एक चमचा, अर्धा चमचा गरम मसाला घालुन त्याला चांगले एक जीव करून घ्यावे. नंतर दोन टोम्याटो मिस्करमध्ये बारीक वाटून घ्यावेत. हा टोम्याटो जूस कढईमधील मिश्रणात घालून पुन्हा मिश्रण एक जीव करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात शिजवलेला भात घालून भात चांगला परतून घ्यावा. भात परतल्यानंतर आपला टोम्याटो राईस तयार झालेला असेल. चिरलेली कोथिंबीर वरून टाकून तो भात पानात वाढा.

Leave a Comment