पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले होते आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनधी | सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमरकर यांच्यावर अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परिसरात असणाऱ्या मेस मध्ये वारंवार आळ्या आढळत असल्याने मुलांनी केलेल्या केलेल्या आंदोलनानंतर वादाचा भडका पेटला होता. या आंदोलनानंतर कुलगुरूंनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची तक्रार चतु:श्रृगी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर संबंधित मुलाने न्यायालयात धाव घेऊन कुलगुरुंवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

विश्वचषक २०१९ भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने

आकाश भोसले या आंदोलनकर्त्यावर एप्रिल महिन्यात आंदोलनादरम्यान सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याने पुणे सत्र न्यायालयात धाव घेऊन कुलगुरू यांच्यासह अन्य ५ व्यक्तींवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मागणीनंतर न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या आदेशानुसार शनिवारी रात्री उशीला पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू आणि अन्य पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर करणार भाजपचा प्रचार

कुलगुरु नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकण, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षा रक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत (सर्व रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) या व्यक्तींवर अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अ‍ॅट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो

महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही

विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

Leave a Comment