जीवनात यशस्वी होण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रेरणादायी | आयुष्यात आपण जे जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशस्वी व्हायचं असतं.आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान बहुतेकवेळा आपल्याला मिळालेल्या यश-अपयशावर ठरतो. त्यामुळेच जर आपल्याला यशस्वीच व्हायचे असेल तर पुढील गोष्टींवर प्रभुत्व मिळणे गरजेचे आहे.

१. आत्मविश्वास – कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण स्वतःवर विश्वास असेल तर यश आपोआपच मिळते. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे जर व्यक्तिमत्व सुधारायचे असेल आणि यश खेचून आणायचे असेल तर आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे.

२. निर्णय घेण्याची क्षमता – निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर सतत होय किंवा नाही या द्वंद्वामुळे नेमके काय करायचे हेच कळत नाही, त्यामुळे याचा परिणाम कार्यक्षमतेवर होतो.त्यामुळे निर्णय घेता आला पाहिजे मग तो चूक असो वा बरोबर.

३. अपयशाची भीती हद्दपार – बऱ्याच लोकांना कोणतेही काम करण्याआधी आपल्याला ते जमेल की नाही याची भीती आधीच असते. थोडक्यात आपण अपयशी होऊ म्हणून ती गोष्ट टाळण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. पण अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा आपल्याला यशच मिळावे असे मनात ठेऊन काम करणे गरजेचे आहे.

४. प्रबळ ईच्छा शक्ती – ईच्छा तिथे मार्ग ही म्हण अगदी बरोबर आहे म्हणूनच कोणतेही काम करताना आपली ईच्छा प्रबळ असेल तर ते काम नक्की होते.यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे फार महत्वाचे असते.
पैसे, सामर्थ्य आणि विद्या असेल आणि ईच्छा शक्ती नसेल तर ती व्यक्ती कधीच यश प्राप्त करू शकत नाही.

५. नाकारात्म विचार काढून टाकणे – मनात नकारात्मक विचार असणे म्हणजे अपयशाला आमंत्रणच आहे. नकारात्मक विचारांमुळे जीवनात फक्त निराशाच हाती येते. त्यामुळे नकारात्मक दृष्टिकोन बदल गरजेचे आहे.

 

इतर महत्वाचे –

बस स्थानाकातून महिलेची पर्स लंपास, १७ तोळे दागिने चोरीला

शेतकरी अवजार लायब्ररी, दुष्काळग्रस्त व गरजू शेतकऱ्यांसाठी पुण्यातल्या तरुणांचा विशेष उपक्रम

पैसे पडले सांगत महिलेला सव्वा लाखांना घातला गंडा

Leave a Comment