कॉंग्रेसचा हा माजी मंत्री वंचितकडून लढवणार विधनासभा निवडणूक?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी  : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० आणि ३१ जूलै रोजी मुंबई काँग्रेसच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्या. मात्र या मुलखतीकडे आघाडी सरकार मधील माजी मंत्र्यांनी पाठ फिरवली असल्याची माहिती समोर आली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, माजी मंत्री सुरेश शेट्टी यांनी उमेदवारी साठी इच्छुकांचा अर्ज केला नाही आणि त्यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवली. महत्त्वाचे म्हणजे माजी मंत्री बाबा सिद्दिकी हे ‘वंचित बहुजन आघाडी’त प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मिळणार वीर चक्र सन्मान

बाबा सिद्दिकी हे १९९२ ते २००२ पर्यंत नगरसेवक, १९९९ ते २०१४ या काळात वांद्रे पाश्चिमचे तीन वेळा आमदार आणि २००४ ते २००९ या आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री होते. ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रसिद्धी विभागाचे निमंत्रक आहेत.

शिवस्वराज्य यात्रा : अमोल कोल्हेंनी डागली देवेंद्र फडणवीसांवर तोफ

दरम्यान, बाबा सिद्दिकी विचारमंथच्या माध्यमातून त्यांनी गेल्या महिन्याभरात अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अचलपूर, अकोट, बाळापूर, पाचूर, मूर्तिजापूर, अमरावती येथे जाहीर सभा घेतल्या. आणि राजकीय पक्षाने अल्पसंख्यांक समाजाला कसे डावलले याची उदाहरणे देत नाराजी व्यक्त केली आहे. याबात बाबा सिद्दिकी यांनी सांगितले की, राजकीय पक्षांच्या बाजूने नेहमीच अल्पसंख्याक समाज खंबीरपणे उभा राहिलेला आहे. मात्र काँग्रेस पक्षाने समाजबांधवांना प्रतिनिधित्व न देता नेहमीच बाजूला सारले आहे. राज्यातील काँगेसच्या असलेल्या १५१ नगरपरिषदा मध्ये अल्पसंख्यांक समाजाला साधे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद सुद्धा देण्यात आले नाही. अल्पसंख्याक समाज काँग्रेसवर नाराज असून आता जो पक्ष समाजाला प्रतिनिधित्व व न्याय देईल त्या पक्षासोबतच समाजबांधवांनी जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट

Leave a Comment