आज भाजपने संविधानाची हत्या केली : गुलाम नभी आझाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | जम्मू कश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० मधील क्लिष्ट अटी काढून टाकण्यासाठी जम्मू कश्मीर सुधारणा विधेयक आज अमित शहा यांनी राज्यसभेत मांडले. त्यानंतर त्यावर बोलण्यासाठी उभा राहिलेल्या गुलाम नाभी आझाद आणि चांगलेच तोंडसुख घेतले. भाजपने लोकशाही आणि संविधान यांची हत्या केली आहे असे गुलाम नभी आझाद यांनी म्हणले आहे.

 

अमित शहा यांनी मांडलेल्या जम्मू कश्मीर सुधाणारा विधयेकावर बोलण्यासाठी उभा राहिलेल्या गुलाम नभी आझाद यांनी सरकारची चांगलीच शाब्दिक चिरफाड केली. कलम ३७० हे भारतासोबत काश्मीरला जोडणारे कलम आहे. त्याचा सरकार दुरुपयोग करते आहे. कश्मीरसाठी ज्या लोकांनी बलिदान दिले. ज्या पक्षांनी आपले नेते गमावले त्यांचा सरकार अपमान करतंय असे गुलाम नभी आझाद म्हणाले.

दरम्यान अमित शहा यांनी आझाद यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच अमित शहा यांनी १ सेकंद सुद्धा कलम ३७० काश्मीर मध्ये सुरु ठेवणे उचित असणार नाही असे म्हणले आहे. कलम ३७० मुळेच कश्मीर मधील दलित आदीवासींना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. तसेच तेथे राजकीय आरक्षण देखील लागू करता येत नाही. कलम ३७० मुळेच कश्मीर मध्ये भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. सर्वाधिक पैसे खर्च केलेले देशातील राज्य जम्मू कश्मीर आहे तर मग तेथील लोक आजवर विकासापासून वंचित का आहेत असे अमित शहा म्हणाले.

Leave a Comment