पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारची तिजोरी रिकामी झाली तर कर्जही काढू : चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी  : सांगली आणि कोल्हापुरात आलेल्या भीषण महापुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. अनेक नागरिकांचे घर पडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शहरी आणि ग्रामीण भागाला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येक पूरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी गरज भासल्यास कर्जही काढू अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्यात शासकीय बैठकीसाठी चंद्रकांत पाटील हे आले असताना. त्यानंतर सांगली आणि कोल्हापूर येथील नागरिकांचे पुनर्वसन कशा प्रकारे करणार त्यावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात ४ लाख ५३ हजार लोकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून आता पुरात कोणीही अडकले नाही. तसेच राज्यात ५०० च्या वर निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. या निवारा केंद्रात ३ लाखापेक्षा जास्त लोक आश्रयाला आहेत. कोल्हापूरमध्ये २ कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. पुराचा फटका बसलेल्या गावच पुनर्वसन सहा ते आठ महिने चालणार आहे.

६ हजार ८०० कोटीमध्ये शेती नव्याने उभा करावी लागणार आहे. पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाणार आहे. कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त गावे दत्तक घेण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ति पुढे येत आहेत. त्यामध्ये पंढरपूर देवस्थान ५ आणि नाना पाटेकर यांची नाम संस्था २ गावं दत्तक घेणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.

Leave a Comment