IPS साहेबराव पाटील यांचा भाजप प्रवेश ; मिळू शकते विधानसभेची उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचा आज महापक्ष प्रवेश पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते IPS साहेबराव पाटील यांना देखील भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. साहेबराव पाटील हे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सेवा निवृत्त झाले आहे. ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच रंगल्या होत्या. त्या चर्चेला आज मूर्तरूप प्राप्त झाले आहे.

भाजप महाप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे युतीबद्दल मोठे वक्तव्य

साहेबराव पाटील आगामी विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत तसेच ते जळगाव शहर आणि पाचोरा या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मागू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात साहेबराव पाटील यांचा खाक्या चालेल असं राजकीय जाणकारांना वाटत नाही. कारण या दोन्ही मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांना डावलून साहेबराव पाटील यांना उमेदवारी मिळणार का हा देखील मोठा प्रश्न आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पराभव करण्याला राधाकृष्णांच्या पत्नीला पाहिजे संगमनेरची उमेदवारी

जळगाव शहरमधून राजू भोळे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर ते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असणाऱ्या गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनाच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाईल असे अनेक वेळा गिरीश महाजन यांनी म्हणले आहे. याच मतदारसंघातून साहेबराव पाटील उमेदवारी मागू शकतात. तसेच पाचोरा विधानसभा मतदारसंघातून देखील साहेबराव पाटील उमेदवारी मागू शकता. मात्र पाचोरा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पाचोऱ्याची जागा सोडण्यास शिवसेना तयार होणार नाही. कारण शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे तेथील शिवसेनेचे आश्वासक नेते आहेत. त्यामुळे साहेबराव पाटील यांना भाजप श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग अवलंबण्याचा आदेश देऊ शकते.

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

म्हणून केला नाही गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश

भाजपचा महाप्रवेश सोहळा संपन्न ; शिवेंद्रराजेंसह इतर आमदारांचा भाजप प्रवेश

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पराभव करण्याला राधाकृष्णांच्या पत्नीला पाहिजे संगमनेरची उमेदवारी

गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट लावली : जितेंद्र आव्हाड

Leave a Comment