पंढरपूर : चंद्रभागा नदीवर बांधलेला घाट उद्घाटनाआधी वादाच्या भोवऱ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर प्रतिनिधी | चंद्रभागा नदीच्या पैल तीरावर वारकरी स्नानासाठी घाट बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इस्कोनसंस्थेला २०० मीटरजागा दिली होती. या ठिकाणी १५ कोटी रुपये खर्च करून इस्कोन संस्थेने येथे घाट बांधला आहे. मात्र हा घाट बेकायेदेशीर आहे. यासाठी प्रशासकीय परवानग्या घेतल्या नाहीत असा ठपका सोलापूर जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे.

आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांना स्नान करण्यासाठी कुंडलिक मंदिराजवळ गर्दीमुळे अडचण निर्माण होते. हि अडचण लक्षात घेवून इस्कोन संस्थेने पैल तीरावर घाट बांधण्याची संकल्पना राज्य शासनाकडे मांडली. त्याला राज्य शासनाच्या वतीने परवानगी देखील देण्यात आली. मात्र हा घाट बांधण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या परवानग्याच इस्कोन संस्थेने घेतल्या नाहीत त्यामुळे त्यांनी १५ कोटी खर्चून बांधलेला घाट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

इस्कोन संस्थेने उभारलेल्या या घाटावर चंद्रभागादेवीचे मंदिर देखील उभारले जाणार आहे. त्या मंदिरात कशीप्रमाणे रोज आरती केली जाणर आहे. त्याच प्रमाणे ११ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घाटाचे उद्घाटन होणार आहे. त्याच प्रमाणे या कार्यक्रमासाठी पंढरीत इस्कोनचे ७ लाख भाविक देखील येणार आहेत. दरम्यान दोन दिवसात या घाटाला शासकीय परवानग्या देण्याचे आदेश सुध्दा मुख्यमंत्री देवू शकतात असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment