लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत फारकत घेऊन त्यांच्यावर टीका करत लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडीत फूट पडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी देखील झाले. तर त्यांनी आज नव्या पक्षाची देखील घोषणा देखील केली आहे. लक्ष्मण माने यांच्या नव्या पक्षाचे नाव महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी असे नाव असणार आहे.या संदर्भात त्यांनी पुण्यातील अरोरा टॉवर येथे पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

ज्यावेळी लक्ष्मण माने यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली त्यावेळी त्यांच्या सोबत न्या. बी. जी. कोळसे पाटील देखील उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांची कार्यपध्द्ती भाजपला फायदेशीर आहे. जातीवादी विचारधारेचे लोक आमच्यामुळे निवडून येण्याचे पाप आमच्या हातून घडू नये म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या पासून दूर जात आहे असे याआधीच लक्ष्मण माने यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आपल्या पक्षाची आघाडी होणार आहे असे लक्ष्मण माने यांनी जाहीर केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या सोबत यासाठी जायचे आहे कि पुन्हा आमच्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये असे लक्ष्मण माने म्हणाले आहेत. वंचित आघाडीत फूट पडल्याने वंचित आघाडीच्या राजकारणाला देखील वेगळे वळण लागले आहे त्याच प्रमाणे याकडे बघण्याची लोकांची रुची देखील बदलली आहे.

हे पण वाचा –

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

वंचित स्वबळावरच ! या तारखेला जाहीर होणार पहिली यादी

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो

ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Leave a Comment