सल्लूच्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलून लव्हयात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बाॅलिवुड अभिनेता सलमान खान याच्या लव्हरात्री या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असून आता ते ‘लव्हयात्री’ असे करण्यात आले आहे. सल्लुचा लव्हरात्री चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवरात्रोत्सव दाखविण्यात आला आहे. त्यावरुन काही धार्मिक संघटनांनी सलमानच्या चित्रपटावर टिका केली होती. तसेच चित्रपटाचे नाव लव्हरात्री असण्यालाही संघटनांनी विरोध केला होता. याप्रकरणी हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी सलमान आणि चित्रपटाशी संबंधित व्यक्तींवर मुझफ्फरपूर कोर्टाने गुन्हा दाखल केला होता. अनेक धार्मिक संघटनांच्या कडवट विरोधानंतर आता सल्लुच्या होमप्रोडक्शनच्या या चित्रपटाचे नाव अखेर बदलण्यात आले आहे.

या वादानंतर चित्रपटाच्या बदलत्या नावाचे पोस्टर ट्विट करत, ‘ही कोणतीही स्पेलिंग मिस्टेक नाही. चित्रपटाचे नाव बदलून ‘लव्हयात्री’ असे ठेवण्यात आले आहे’ असं सलमानने स्पष्ट केले आहे. या चित्रपटात सलमानची लाडकी बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत वरीना हुसैन बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे .

Leave a Comment