शरद पवारांनी केले मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप ; कोणी पक्षांतर केल्याने आम्हाला फरक पडत नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षांतराच्या मुद्दयांवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर देखील गंभीर आरोप लावले आहेत. ईडीच्या चौकशा लावू असे म्हणून मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी धमकावत आहेत असा गंभीर आरोप शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत लावला आहे.

कोणीही पक्ष सोडून गेल्याने काहीही फरक पडत नाही. याआधी देखील मी अशी परिस्थिती बघितली आहे. त्यामुळे परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे मला चांगलेच माहित आहे. त्यामुळे कितीही पक्षांतर झाली तरी महालाला आम्हाला काही फरक पडणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात कोणकोणत्या नेत्याला भाजपने आपल्याकडे वळवण्यासाठी काय काय युक्ती लढवली याचा पाढाच शरद पवार यांनी वाचून दाखवला. त्याच प्रमाणे चित्रा वाघ या मला भेटून गेल्या आहेत. त्यांच्या नवऱ्यावर असणाऱ्या केसेस मुळे त्यांना पक्षांतर करणे भाग आहे असे देखील त्या म्हणाल्या असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच कल्याणराव काळे यांना देखील भाजपने असेच आपल्यात सामील करून घेतले आहे असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच राहुल कुल यांची देखील भाजपने अशीच शिकार केली आहे असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडणार आहे. तसेच वादविवादाचे सत्र देखील सुरु होणार आहे.

म्हणून चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ

राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त

महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड

Leave a Comment