दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज होणार शेवट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक २०१९  च्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १८ तारखेला मतदान नोंदवले जाणार आहे. यासाठी प्रचाराचा आज शेवट होणार आहे. या टप्प्यात राज्यातील बऱ्याच दिग्गजांचे भविष्य परवा मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे.

या टप्प्यातील महत्वाच्या लढती म्हणजे सोलापूर मधून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात होणारी प्रकाश आंबेडकरांची लढत. तिकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या विरोधात प्रताप पाटील चिकलीकर यांच्यात होणारी लढत. तर अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव आडसूळ विरुद्ध नवनीत राणा असा सामना बघायला मिळणार आहे.

शेवटच्या दिवशी प्रचाराची लगबग अनेक राजकीय  नेत्यांमध्ये बघायला मिळणर आहे. नांदेड मध्ये आज अशोक चव्हाण रोड शो करणार आहेत. तर  वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर जाहीर सभा घेणार आहेत. तर सुशीलकुमार शिंदे सोलापुरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधणार आहेत. उदगीरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या उमेदवारासाठी सभा घेणार आहेत. तर अकोल्यात नितीन गडकरी प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात सभा घेणार आहेत.

या मतदारसंघात होणार १८ एप्रिलला  मतदान  

सोलापूर, नांदेड, लातूर,  बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, परभणी.

 

Leave a Comment