भाजपच्या २५० जागा येणार तर मग आम्ही उरलेल्या २८ जागी गोट्या खेळायच्या का : राज ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्यांच्या किती जागा निवडून येणार याबद्दल तंतोतंत अंदाज व्यक्त करतात. विधानसभा निवडणुकी बद्दल देखील कोणी तरी अंदाज व्यक्त केला की, भाजपच्या २५० जागा निवडून येणार म्हणे. जर भाजपच्या २५० जागा निवडून येणार असतील तर मग आम्ही काय २८ जागी गोट्या खेळायच्या का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. भाजपवर टीका करून राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केले आहे.

शरद पवारांचे जवळचा नातेवाईक आणि राष्ट्रवादी आमदार असणारा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला त्यावेळी राज ठाकरे यांनी भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. ‘ज्यादिवशी महाराष्ट्रावर या भाजपच्या लोकांचा वरवंटा फिरेल तो मराठा ब्राह्मण, माळी किंवा धनगर म्हणून नाही तर मराठी म्हणून फिरेल. तेव्हा भाजपला समर्थन देणाऱ्यांना कळेल,’ असे म्हणून राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेला फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीला भाजपने ठरवले होते. शिवसेनेच्या चार जेष्ठ नेत्यांना पडायचे. ते त्यांनी सूत्रबद्धपणे पाडले आहे. ईव्हीएमची चिप अमेरिकेत बनते. त्यात आधी काय मेमरी भरलेली आहे याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. ना निवडणूक आयोग याबद्दल उत्तर देतोय ना पत्रकार याबद्दल बोलतात. ते असे बोलतील त्यांची आधीच सरकारने गळचेपी केली आहे असे राज ठाकरे आहेत.

चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले

गिरीश महाजनांच्या पूर पर्यटनाचा विरोधांसोबत नेटकऱ्यांनी घेतला खरपूसर समाचार

शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल

सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस

Leave a Comment