ताज्या बातम्यापुणेराजकीय

हा तर सरकारचा क्रिमिनल हलगर्जीपणा ; पूरस्थितीवर अमोल कोल्हेचा सरकारवर निशाणा

नारायणपूर प्रतिनिधी |  राष्ट्रवादी काँग्रेसने आरंभलेली शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्थगित करून आपला दौरा सांगली कोल्हापूरकडे पूरग्रस्त लोकांच्या भेटीकडे वळवला आहे. त्याआधी त्यांनी आपल्या मायभूमी असणाऱ्या नारायण गावात येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले आहे.

पुरामध्ये ठार झालेल्या मुलाचे आणि बाळाचा फोटो बघितला तर गहिवरून येते. सरकार पूरपरिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. पुराच्या पाण्यात लोकांचे जीव जाणे हा सरकारचा क्रिमिनल हरगर्जीपणा आहे अशा घणाघाती आरोप आमोल कोल्हे यांनी केला आहे. अमोल कोल्हे यांनी पूरग्रस्तांच्या भेटीला जाताना हजारो भाकरी सोबत घेऊन जाण्याचा निर्धार त्यांच्या मतदानरसंघातील जनतेला बोलून दाखवला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन त्यांच्या मतदारसंघातील जनतेला केले असता. अमोल कोल्हेंच्या आवाहनावर हजारो भाकरी घराघरातून आल्या.

दरम्यान अमोल कोल्हे यांच्या कोल्हे मळ्यात देखील बायकांनी त्यांच्या घरी भाकरी देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सर्व भाकरी घेऊन अमोल कोल्हे आज पुरग्रस्तांच्या भेटीला गेले आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares