कोल्हापूरला खंडपीठ झालंच पाहिजे, आमदारांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झालेच पाहिजे, अशी मागणी करत कोल्हापूरच्या आमदारांनी विधानभवना बाहेर जोरदार निदर्शने केली.

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी तेथील जनतेची मागणी आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील हजारो खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायासाठी येथील जनतेला नाहक मुंबईला खेटे घालावे लागतात. कोल्हापूर खंडपीठासाठी वकील, पक्षकार, विविध संघटना यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र आश्वासनापलिकडे सरकारने काहीही दिलेले नाही. असे म्हणत या आमदारांनी सरकारवर निशाना साधला.

याद्वारे आम्ही सरकारचे लक्ष वेधून घेत आहोत. सरकारने मंत्रिमंडळात ठराव करुन कोल्हापूरच्या हक्काचे खंडपीठ द्यावे आणि कोल्हापूर परिसरातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी या आमदारांनी केली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Comment