म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत केली वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी |  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जम्मू कश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्या नंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या राष्ट्रीय मुख्यालयात अर्थात रेशीम बाग या या ठिकाणी राहतात. त्यांच्या राहत्या ठिकाणी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अंगरक्षणांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना या अगोदरच झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्या सुरक्षेत देखील वाढ केली गेली आहे. रेशीम बाग या संघ मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांची क्यू आर टी तुकडी तैनात करण्यात आलेली आहे. त्या तुकडीत वाढकरण्यात आली असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून हि खबरदारी घेतली असल्याचे बोलले जाते आहे.

दरम्यान भारताने कश्मीर मधील ३७० कलम हटवल्यानंतर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील उमटले आहेत. पाकिस्तानची बाजू घेऊन चीनने संयुक्त राष्ट्र संघात कश्मीर विषयावर गुप्त बैठक घेण्याची मागणी केली होती. तर पाकिस्तानने भारतासोबत असणारा व्यापार थांबवून भारतात बनणाऱ्या वस्तू वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे कश्मीर मुद्दा नेमके काय वळण घेईल हे बघण्यासारखे राहणार आहे.

राष्ट्रवादीचा लोकसभा उमेदवार झालेल्या त्या शिवसेना नेत्याची उद्या घर वापसी

मुंबई मनपाच्या ५८ हजार कोटीच्या फिक्स ठेवी तरी देखील मुंबई पाण्यात बुडते ; गडकरींचा शिवसेनेला घरचा आहेर

म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी जमले २ दिवसामध्ये २० कोटी

विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; काँग्रेस नेत्यांनी भोवया उंचावल्या

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे आले आमने सामने

Leave a Comment