मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई | प्रतिनिधी राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये जाऊ लागले आहेत. अशात मुंबई नंतर नवी मुंबई राष्ट्रवादीला हादरा देण्याच्या मनस्थितीत आहे असेच चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांच्याच गटाचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रह करत आहेत. त्यांच्यावर नैतिक दबाव टाकत आहेत असे चित्र राजकीय आहे.

गणेश नाईक यांना अद्याप देखील राष्ट्रवादीत राहावेसे वाटते मात्र नगरसेवकांच्या रेट्यापुढे त्यांचे काहीच चालणार नाही अशी माहिती राजकीय जाणकारांनी दिली आहे. तसेच सध्या महापौर बंगल्यावर गणेश नाईक यांच्या गटाच्या ५७ नगरसेवकांची बैठक पार पडत आहे. त्या बैठकी नंतर राष्ट्रवादीचे हे नगरसेवक एकत्रितपणे गणेश नाईक यांना आपला निर्णय सांगू शकतात. तसेच त्यांना राष्ट्रवादी सोडण्यास तयार करू शकतात असे बोलले जाते आहे.

मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे हे नगरसेवक भाजपच्य नेत्यांच्या संपर्कात होते. १४ नगरसेवकांचा गट राष्ट्रवादी सोडायला तयार देखील झाला होता. मात्र गणेश नाईक यांचा दरारा एवढा मोठा की हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याची त्यांची इच्छा त्यांनी आपल्या पक्षाच्या इतर नगरसेवकांना प्रलोभित करू लागली आणि आता राष्ट्रवादीचे ५७ नगरसेवक गणेश नाईक यांना भाजपमध्ये जाण्यास दबाब टाकू लागले आहेत.

Leave a Comment