राष्ट्रवादीने पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या नावाने फटाके वाजवून केला शिंमगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा प्रतिशोध म्हणून राष्ट्रवादीने निखराची लढाई करण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबई मधील प्रदेश कार्यालयासमोर फटाके वाजवून पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या नावाने शिंमगा केला आहे. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे असे म्हणून राष्ट्रवादीने लढाईच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.

 

राष्ट्रवादी खिळखिळा झाल्याने अस्वस्थ झाली आहे अशी टीका भाजपचे नेते करतात त्याचाच प्रत्येय राष्ट्रवादीने आज केलेल्या कृतीतून दाखवून दिला आहे अशा चर्चा राजकीय जाणकारांमध्ये झडू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादीला चांगलीच गळती लागली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पक्ष सोडायला सरकारी यंत्रणाचा वापर केला जात आहे असे गंभीर आरोप केले. तरी देखील राष्ट्रवादीचे नेते पक्षांतर करायचे थांबले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीची अस्वस्थता वाढली.

दरम्यान राष्ट्रवादीने पडलेले खिंडार भरून काढण्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढण्याचा संकल्प सोडला आहे. या शिवस्वराज्य यात्रेचे स्टार प्रचारक खासदार उदयनराजे भोसले असणार आहेत. या यात्रेला आमोल कोल्हे यांच्या ग्लॅमर्स चेहऱ्यामुळे प्रतिसाद चांगला मिळेल मात्र त्याचे रूपांतर मतात रूपांतर होणार नाही असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment