ताज्या बातम्यामुंबई

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५० लाख रुपये

मुंबई प्रतिनिधी : सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन  मुसळधार पावसामुळे  विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत सर्व स्तरांवरून मदतीचा हात पुढे येत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेही पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ५० लाखांचा  निधी देण्यात आला आहे. इतकेच नाही तर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २५ वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे .

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे . मात्र आता टीका न करता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्ष धावला आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे , विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक , आमदार जितेंद्र आव्हाड आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते .

दरम्यान विरोधकांनी पूरस्थितीचं राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करावी. सरकारच्या उणिवा दाखवून द्या; पण राजकारण करू नका , असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले आहे .

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares