दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यास राष्ट्रवादी बार्शीत देणार ‘हा’ तगडा उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांना शिवसेना प्रवेशाचे वेध लागले आहेत.त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना युतीची उ,उमेदवारी मिळेल आणि राजेंद्र राऊत यांना अपक्ष निवडणूक लढावी लागेल आसा त्यांचा कयास आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांना उमेदवारी दिली जाणारअसल्याची सध्या सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

माझ्या विरोधात ईडीची नोटीस काढून दाखवा ; सुप्रिया सुळेंचे सरकारला ओपन चॅलेंज

राष्ट्रवादीच्या वर्धापन दीना दिवशीच शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले होते. त्याच विधानाला अनुसरून कृती म्हणून राष्ट्रवादी बार्शीतून बाळराजे पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राजन पाटील यांचे जिल्ह्यात चांगले नाव आहे. त्याच प्रमाणे बाळराजे पाटील यांना उमेदवारी दिल्यास दिलीप सोपल यांना मिळणारी मराठा मते बाळराजे पाटील यांना मिळतील असा राष्ट्रवादीच्या जाणकारांचा अंदाज आहे. तसेच १९५४ पासून वेगळ्या तालुक्याची मागणी करणारी वैराग भागातील ६७ गावे २००९ पर्यंत मोहळ मतदारसंघाला जोडण्यात आली होती. त्यामुळे या गावांमध्ये राजन पाटील त्यांचे वडील दिवंगत माजी आमदार शंकरराव पाटील यांना मानणारी जुनी जाणती माणसे आहेत. त्यामुळे या बाबीचा बाळराजेंना फायदा होण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता लक्षात घेऊनच राष्ट्रवादी दिलीप सोपल यांच्या विरोधात बाळराजे पाटील यांना निवडणुकीच्या रणात उतरवण्याची शक्यता आहे.

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

दरम्यान दिलीप सोपल यांचे जवळचे सहकारी नागेश अक्कलकोटे हे दिलीप सोपल याच्या सोबत शिवसेनेत जाणार नाहीत. दिलीप सोपल यांच्या राजकीय डावपेचाचा चांगलाच अंदाज असणारे नागेश अक्कलकोटे दिलीप सोपल यांना चांगलीच ठस्सलं देऊ शकतात. म्हणून त्यांचे देखील नाव राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्याच प्रमाणे वैरागचे निरंजन भूमकर यांचे देखील नाव चर्चेत आहे.

तो पर्यंत फेटा बांधणार नाही ; अमोल कोल्हेंची ‘भिष्य प्रतिज्ञा’

दिलीप सोपल शिवसेनेत गेले आणि राजेंद्र राऊत अपक्ष उभा राहिले तर दिलीप सोपल यांच्या मताचे ध्रुवीकरण होऊन अपक्ष राजेंद्र राऊत विजयी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच प्रमाणे बाळराजे सारखा तगडा उमेदवार राष्ट्रवादी आपल्या विरोधात उतरवणार असे समजल्याने दिलीप सोपल आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे देखील बोलले जाते आहे. तर शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले आणि दिलीप सोपल राष्ट्रवादीचे उमेदवार, राजेंद्र राऊत भाजपचे उमेदवार आणि अन्य कुणी तर शिवसेनेचा उमेदवार आसा सामना झाल्यास दिलीप सोपल निवडून येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. या मतदारसंघात वंचित फॅक्टर चालणार नसल्याचे देखील बोलले जाते आहे. त्यामुळे अशा सर्व भेळ मिसळीमध्ये विधानसभेला कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बार्शी विधानसभेच्या सर्वात वेगवान बातम्या मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा. 

पुढील लिंकवर क्लिक करा आणि आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा – http://bit.ly/30zJ2wq

WhatsApp Group Link – Click here to Join Group

WhatsApp Nambar – 9890324729

Leave a Comment