भाजप प्रवेशावर उदयनराजे म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आपल्या बंधू प्रमाणे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा माध्यमामधून सतत चालू असतानाच उदयनराजेंनी या बद्दल मौन सोडले आहे. फलटणमध्ये माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंनी या संदर्भात भाष्य केले आहे.

आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत असे पत्रकरांनी विचारताच उदयनराजेंनी त्यावर असे भाष्य केले की प्रवेशाचा काही विषय नव्हता मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातील पूरग्रस्त लोकांना मदत द्यावी यासाठी भेटायला गेलो होतो. त्यामुळे याचा अर्थ तुम्ही वेगळा काढला असे देखील उदयनराजे म्हणाले आहेत. उदयनराजेंनी भाजप प्रवेशाला पूर्णविराम दिला असला तरी माध्यमांना चकवा देण्यास उदयनराजे मुसद्दी आहेत. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश होईल की नाही हे येत्या काळातच समजू शकते.

दरम्यान या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. माझा मित्र खासदार झाल्याचा मला खूप आनंद झाला आहे आमची मैत्री खूप जुनी आहे असे देखील उदयनराजे म्हणाले आहेत. त्यांच्या या कौतुकाबद्दल देखील तर्क वितर्क वर्तवले जात आहेत.

Leave a Comment