रामराजेंची जीभ हासडून हातात दिली असती : उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या बैठकीतून उदयनराजे भोसले बैठक अर्ध्यावर टाकून बाहेर पडले आहेत. त्यांनी बाहेर पडताच माध्यमात आपली प्रतिक्रिया दिली असून यात त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर कडाडून टीका केली आहे. रामराजे माझ्या पेक्षा वयाने मोठे आहेत म्हणून त्यांच्या वयाचा आदर राखतो ते जर माझ्या वयाचे असते तर त्यांची जीभ हासडून हातात दिली असती असे उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

विजयसिंह मोहिते पाटील यांना मिळणार कॅबेनेट मंत्रिपद!

उदयनराजे भोसले यांनी मागील दोन दिवसापूर्वी नीरा देवधर धरणाचे पाणी बारामतीला सोडण्याचे बंद केल्याच्या कृतीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियेत त्यांनी रामराजेंवर टीका केली होती. तेव्हा त्यांच्या टीकेला उत्तर देताना रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंवर खालच्या पातळीला उतरून टीका केली होती. त्या संदर्भात उदयनराजेंना आणि रामराजेंना समजून सांगण्यासाठी शरद पवार यांनी दोघांना एकत्र बोलवत बैठक लावली होती. मात्र त्या बैठकीतून उदयनराजे बाहेर पडले.

शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची लागणार मंत्री पदी वर्णी

मला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर मी उघड उघड जाईल मात्र तुमच्या जर कोणत्या पक्षा सोबत वाटाघाटी चालल्या असतील तर त्याचे खापर आमच्या मस्तकी फोडू नका ना. तुम्हाला जायचं तर उघड उघड जा असे रामराजेंचे नाव नघेता उदयनराजे म्हणाले आहेत. मी कबूल करतो कि मी चक्रम आहे. पण मी लोकांवर अन्याय अत्याचार झाल्यास चक्रम होतो. मागच्या जन्मात मी काही पुण्य केले असेल म्हणून मला छत्रपतींच्या घरात जन्माला घातले. या घराण्याचा समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन मी चाललो आहे. अशात मला पिसाळलेले कुत्रे चावल्यास मला रेबीस व्हायचा असे उदयनराजे म्हणाले आहेत. उदयनराजेंनी त्यांच्यावर झालेली टीका मोठ्या शीतापाने रामराजेंवर पलटवण्यात यश मिळवले आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील मंत्री पदापासून वंचितच!

Leave a Comment