माध्यमांमध्ये टीका होताच पुरग्रस्तांच्या मदतीचा तो फोटो जयंत पाटलांनी हटवला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज स्वतःचे फोटो लावून मदत करू नका असे आवाहन केले असले तरी नेते या स्थितीचे राजकारण करण्याचे सोडत नाहीत. मात्र जयंत पाटील यांनी शिथापीने आपल्या फेसबुक पेज वरील त्यांच्या फोटोसहित केल्या जाणाऱ्या मदत कार्याचा फोटो उडवला आहे.

जयंत पाटील यांच्या घरून पूरग्रस्त लोकांसाठी जेवणाचे पॅकेट जात होते. या पॅकेटच्या बॉक्सवर जयंत पाटील यांचा फोटो असल्याचे निदर्शनास आले होते. या संदर्भात त्यांच्यावर मीडियात टीका होऊ लागताच त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकलेला तो मदत कार्याला फोटो हटवला आहे. त्यांनी तो फोटो हटवल्या नंतर देखील सोशल मीडियात त्यांच्याबद्दल चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा देखील भाजप सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या मदत कार्यात फोटो होता असा अशा आशयाचे देखील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्याच फोटोची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे फोटो चिटकवून मदत कार्य करू नये असे आवाहन केले आहे.

1 thought on “माध्यमांमध्ये टीका होताच पुरग्रस्तांच्या मदतीचा तो फोटो जयंत पाटलांनी हटवला”

Leave a Comment