मुंबई मनपाच्या ५८ हजार कोटीच्या फिक्स ठेवी तरी देखील मुंबई पाण्यात बुडते ; गडकरींचा शिवसेनेला घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | जे काही बोलायचे ते रोख ठोक बोलायचे यासाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. ५८ हजार कोटी रुपयांच्या फिक्स ठेवी मुंबई महानगरपालिकेच्या बँकेत आहेत तरी देखील दर वर्षी मुंबई पाण्यात बुडते असा टोला नितीन गडकरी यांनी शिवसेनेला लगावला आहे. मुंबई मनपामध्ये शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे. त्याच प्रमाणे मुंबईमध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यावरून शिवसेना बदमान आहे.

आदंबर निकोबार बेटानंतर पहिला कांदळवन प्रकल्प मुंबईमध्ये उभा राहणार आहे. बोरिवलीमधील गोराईत हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी आणि विनोद तावडे देखील उपस्थित होते. इटलीतील व्हिनीसप्रमाणे वाटर टॅक्सी आपल्या देशात देखील सुरु करायला पाहिजे त्यातच शहरांचे भले आहे. मी मुंबईमध्ये कमी प्रमाणात येत आसलो तरी मी स्वतःला खरा मुंबईकर मानतो असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

दरम्यान महानगरपालिकेने मनात आणले तर मुंबईचा समुद्र किनारा मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्या सारखा काचेसमान चकचकीत करतील. पूर्व किनाऱ्यावर उभारण्यात येणाऱ्या ८५० हेक्टर उद्यानाचा प्रकल्प मंजूर झाला तर फार मोठी गोष्ट घडून येईल असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचा लोकसभा उमेदवार झालेल्या त्या शिवसेना नेत्याची उद्या घर वापसी

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे आले आमने सामने

म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी जमले २ दिवसामध्ये २० कोटी

विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; काँग्रेस नेत्यांनी भोवया उंचावल्या

म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत केली वाढ

Leave a Comment