पूरामुळे निवडणुका पुढे ढकण्याच्या मुद्दयांवर शरद पवारांनी केले हे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |  पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे राज्याचे राजकारण देखील चांगलेच ढवळून काढले आहे. आता पूर ओसरला मात्र, तेथील जनजीवन सावरण्यासाठी अनेकांच्या मदतीची आवश्यकता आहे. तसेच त्यांच जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी अजून काही महीने लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सद्यास्थिती पाहता दोन महीन्यांनी येणारी राज्याची विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकण्यात यावी असा सूर निघत आहे. परंतू याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.

‘महापूर हा दोन जिल्ह्य़ातील प्रश्न आहे. त्यासाठी संपूर्ण राज्याची निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही असे शरद पवारह यांनी म्हटले आहे. तसेच निवडणूक आता जवळ आली आहे त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पूरग्रस्तांसाठी निर्णय व्हायला हवा असेही पवार म्हणाले.

त्याचप्रमाणे केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. राज्याने केंद्राकडे ६ हजार ८०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. मात्र महापुरामुळे झालेलं नुकसान मोठं आहे त्यामुळे ही मदत पुरेशी नाही. दोन्ही ठिकाणी सरकार एकच आहे. पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने सरकारने मदत करण्याची गरज आहे. वेळ पडल्यास कर्ज काढूनही मदत केली पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.

Leave a Comment