असले चाळे बंद करा : पंकजा मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परळी प्रतिनिधी | महाराष्ट्रातील कोणताही नेता असो, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्या पंचायत समित्यांचे उद्घाटन करायचे असल्याने त्याला माझी एनओसी घ्यावी लागते. तुम्ही परळीचे काय घेऊन बसलात. आता ते असले छिलोर चाळे बंद करा असे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव नघेता सुनावले आहे.

काल धनंजय मुंडे यांनी परळीच्या पंचायत समितीचे उद्घाटन केले. त्याचा आज पंकजा मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. माझ्या एनओसी शिवाय अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्या पंचायत समितीचे देखील उद्घाटन होऊ शकत नाही. मग हे तुमचे असे राजकारण बरे नव्हे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्ष नेते गेल्या पाच वर्षात कधीच उपस्थित राहिले नाहीत. यावरून त्यांना जिल्ह्याच्या विकासाची किती कळकळ आहे हे समजून येते असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

राज्यात आमचे सरकार यायच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार या राज्यात होते. त्यांचे सरकार असताना त्यांचे जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी निधी का आणला नाही. लोकांनी मला मागणी केली कि पंचायत समितीचे ऑफिस नव्याने बांधण्याची आवश्यकता आहे अशी मागणी केली. मी ती लगेच तडीस लावली असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

Leave a Comment