नरेंद्र मोदींच्या फडणवीसांना जन्मदिनाच्या खास शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करून देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘महाराष्ट्राच्या उत्साही आणि गतिशील मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासाचा उच्चांक गाठला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गरिबांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे.’ असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वयाची ४८ वर्ष पूर्ण केली आहेत. वयाच्या ४३ व्या वर्षी मुख्यमंत्री होऊन देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा विक्रम प्रस्तापित केला होता. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे कमी वयात बनलेले मुख्यमंत्री आहेत. तर पहिला क्रमांक शरद पवार याचा आहे. त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्यात देखील दुसरा क्रमांक पटकावला आहे. कारण त्यांच्या आधी वसंतराव नाईक यांचा अफवाद वगळला तर कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नव्हता.

Leave a Comment