ईडी नोटिसीचे ‘राज’कारण ; २२ ऑगस्टला मनसे ईडी कार्यालया समोर करणार शक्तिप्रदर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल भूखंड प्रकरणी नोटीस पाठवून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. कोहिनूर मिल भूखंड विक्री संदर्भात काही तरी काळेबेरे आहे असा ईडीला संशय आहे. म्हणूनच ईडीने राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र या सर्व प्रकारात मनसेने राजकारण करण्याचा चांगलाच इरादा केला असून मनसे शक्तिप्रदर्शन करून ईडीवर दबाव टाकण्याचा आणि मनसेसाठी लोकांची सहानभूती मिळवण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे.

राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात गेले की मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे कार्यालयाच्या बाहेर एकत्रित यायचे असे नियोजन मनसेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. या संदर्भात आज मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबई मध्ये पार पडली. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात पक्ष संघटनेचा निर्णय जाहीर केला आहे.

२२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मनसेचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयासमोर येणार आहे. तसेच आम्ही पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्यास तयार आहोत. तसेच राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्यावर कसलीही कारवाही झाली की मनसेचे कार्यकर्ते त्यांच्यामागे ठाम पणे उभा राहतात. मग जाळफोळ हि ठरलेली बाब असते असा पूर्वप्रगात असला तरी यावेळी मनसे मवाळ भूमिकेत आहे असे दिसते आहे.

Leave a Comment