ताज्या बातम्यापुणेराजकीय

राष्ट्रवादी फक्त मराठ्यांचा पक्ष ; त्या निनामी पत्राने राष्ट्रवादीमध्ये खळबळ

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फुटीचे ग्रहण लागलेले असतानाच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने एक निनामी पत्र पाठवून चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की राष्ट्रवादीत सर्वच मोठ्या पदावर मराठा समाजाचे लोक बसवले जातात. शहराचे अध्यक्ष, खासदार , मनपा विरोधी पक्ष नेते, आठ विधानसभा मतदारसंघापैकी ७ मतदारसंघाचे अध्यक्ष मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे पक्षाने आता अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष पद देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला द्यावे आणि मराठा समाजाचा कोरम पूर्ण करावा अशी जळजळीत टीका या पत्रातून राष्ट्रवादीवर करण्यात आली आहे. या पत्राने एक प्रकारे राष्ट्रवादीला आरसाच दाखवला आहे.

ए गप्प बसायचं ! चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्त शेतकऱ्याला अरेरावी

वंदना चव्हाण म्हणतात की पुणे जिल्ह्यातील कोणतीही निवड असली कि अजित पवार स्वत: त्या निवडीकडे लक्ष देतात. स्वत: ती निवड करतात. मग मला प्रश्न पडला आहे या ज्या नेमणुका केल्या आहेत त्या स्वत: अजित पवार यांनीच केल्या आहेत काय असे या पत्रात म्हणले आहे. शरद पवार म्हणतात की सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन पक्षाचे काम करा जेणेकरून पक्ष मजबूत होईल. परंतु त्यांच्या विधानात आणि पक्षाच्या निर्णयात एवढी विसंगती का आहे असे या पत्रात म्हणले आहे.

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

समाजाला दाखवला विविध जातीच्या आरक्षणासाठी पक्ष आंदोलन करतो. पक्ष ज्यांच्यासाठी आंदोलन करतो त्या जातीचे किती लोक पक्षात काम करतात असा खरमरीत सवाल देखील या पत्रात उपस्थित केला आहे. या पत्राने पक्षीय राजकारणातील जातीवाद पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. हा कार्यकर्ता नेमका कोण आहे. त्यांनी अशा प्रकारचे पत्र का लिहले त्याचा खुलासा अद्याप होऊ शकला नाही. मात्र या पत्राने राष्ट्रवादीच्या जातीवादावर चांगलाच प्रकाश टाकला आहे.

पूरग्रस्तांसाठी संभाजीराजे करणार ५ कोटींची मदत

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares