या तीन अटीवर रामराजे निंबाळकर करणार भाजपमध्ये प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनाउत आला आहे. राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहत नाही. उदयनराजे भोसले यांच्या सोबत असलेल्या वादात नेहमी राष्ट्रवादी उदयनराजेना पाठीशी घालते आणि रामराजे बाबत पक्षपात करते ही करणे पुढे करून रामराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तिकीट मिळण्याच्या खात्रीमुळेच शिवसेनेत प्रवेश करत आहे

रामराजे निंबाळकर सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यावर त्यांच्यावर अविश्वासाचा ठरवा आणून त्यांचे सभापती पद काढून घेण्याचा कुटील डाव भाजप कडून रचला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांना आपले पद कायम राखण्यासाठी भाजपमध्ये जाऊ वाटत आहे. राष्ट्रवादीत स्वतःचे स्थान कोते होत असल्यानेच ते या निर्णयापर्यत आले आहेत असे बोलले जाते आहे.

आदित्य ठाकरेंचे वरातीमागून घोडे ; उद्या करणारा कोल्हापूर सांगली पूरग्रस्त भागाचा दौरा

दरम्यान रामराजे निंबाळकर यांनी स्वतःच्या भाजप प्रवेशाबद्दल तीन अटी ठेवल्या आहेत. त्या तीन अटी म्हणजे तीन मतदारसंघ आहेत. पहिला मतदारसंघ म्हणजे स्वतःचा होमपीच असणारा फलटणचा मतदारसंघ. या मतदारसंघात तिकीट रामराजे म्हणतील त्या व्यक्तीला देण्यात यावे हि रामराजेंची पहिली अट आहे. त्याच प्रमाणे त्यांची दुसरी अट अशी की वाई विधानसभा मतदारसंघ रामराजे निंबाळकर यांना स्वतः साठी हवा आहे. तर तिसरी अट कुलाबा हा रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ रामराजे यांना स्वतःचे जावई राहुल नार्वेकर यांच्यासाठी हवा आहे. अर्थात त्यांची तिसरी मागणी पूर्ण होण्याची शकता कमीच आहे. कारण कुलाब्यातून राज पुरोहित हे भाजपचे आमदार या मतदारसंघातून सध्या प्रतिनिधीत्व करत आहेत. भविष्यात तेच या मतदारसंघाचे आमदार राहतील अशी शक्यता आहे. मात्र रामराजे निंबाळकर आपल्या अटी शिथिल करून भाजपात दाखल होण्याची शक्यता नाकारत येणार नाही.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

लहान बहीण देणार मोठ्या बहिणीला ‘जिवनदान’ वडिलांचे शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा

गणेश नाईकांचा भाजपला धक्का ; त्यांच्या ‘या’ कृतीने भाजप हैराण

राज ठाकरेंना नोटीस आलेले कोहिनूर मिल प्रकरण नेमके आहे तरी काय?

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक

Leave a Comment